सिंगापूर





 

  सिंगापूर

सिंगापूर हा दक्षिण पूर्व आशिया मधील एक 728 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला एक छोटासा देश आहे, जागतिक बॅंकेच्या आकडेवारीनुसार दोन हजार वीस पर्यंतची सिंगापूर लोकसंख्या ही फक्त 60 लाख आहे. भारतीय पर्यटकांमध्ये सिंगापूरच्या एक वेगळे आकर्षण आहे.भारतातून हजारो हौशी पर्यटक दरवर्षी सिंगापूरला भेट देतात. भारतामधून ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड ,इंडोनेशिया यात प्रामुख्याने बाली इथे जाण्यासाठी भारतीय पर्यटकांना सिंगापूर हा एक पर्याय आहे. सिंगापुर हे नाव घेतले असता डोळ्यासमोर येतात युनिवर्सल स्टुडियो ,जूरॉंग बर्ड पार्क .गार्डन बाय बे, मरलायन पुतळा,सेंटोसा आयलँड, सिंगापूर नाईट सफारी. भारतातील सर्व प्रमुख शहरातून सिंगापूर हे विमान सेवेने जोडले गेलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दिल्ली,मुंबई ,कोलकाता, चेन्नई, कोईमतुर ,बंगळूर, कोची ही प्रमुख शहरे आहेत. सिंगापूरला वर्षातून तुम्ही कधीही भेट देऊ शकता, सिंगापूर येथील चलन हे सिंगापूर डॉलर आहे, भारतीय रुपयांमध्ये याची किंमत साधारण 50 ते 52 रुपये या दरम्यान येथे. सिंगापूर येथील चांगी एयरपोर्ट हे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. भारतातून साधारणत आठ तासाच्या अंतरावर असणारे सिंगापूर, संपूर्ण परिवारासाठी पाच दिवसाची छोटीसी सफर ही वर्षातून कधीही करता येऊ शकते. सिंगापूरची सोपी असणारी विजा पद्धती कमीत कमी खर्च सर्व प्रमुख शहरातून असणारे कनेक्टिव्हिटी त्यामुळे सिंगापूर हे भारतीय पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण आहे. गेल्या काही वर्षापासून भारतीय पर्यटक सिंगापूर सोबत येथे असणाऱ्या क्रूज घेऊ शकतात. सिंगापूरमध्ये भरपूर सारे पर्यटन स्थळे आहेत त्यापैकी काही पर्यटन स्थळ

सिंगापूर नाईट सफारी

सिंगापूर नाईट सफारीमध्ये तुम्ही कॉम्बो टिकेट हा ऑप्शन घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला सिंगापूर जू, रिवर सफारी ,नाईट सफारी,जुरोंग बर्ड पार्क ,ट्रम् राईड,बोट राईड,हे सर्व फक्त 85 सिंगापूर डॉलर्स एवढ्या किमतीमध्ये मिळतील.

सिंगापूर नाईट सफारी ही चार वेळा मध्ये सुरुवात होते साधारण संध्याकाळी 7.15 , 8.15 ,9.15,10.15. यापैकी तुम्ही संध्याकाळी 7.15 ही वेळ घेऊ शकता. सुरुवातीला तुम्हाला थोडासा आत गेल्यानंतर , तुम्हाला फायर शो पाहायला मिळतो. फायर शो झाल्याच्या नंतर,ट्राम राईट साठी जाऊ शकता,यामध्ये तुम्ही जंगली प्राण्यांना अगदी जवळून बघू शकता यामध्ये तुमच्यामध्ये आणि जंगली प्राण्यांमध्ये कुठलेही बॅरिकेट्स नाहीयेत.सिंगापूर नाईट सफारीमध्ये सिंगापूर नाईट सफारीचा सिग्नेचर शो, म्हणजे येथील निशाचर प्राण्यांचा शो तुम्ही पाहू शकता हा शोध तुम्हाला एक वेगळा अनुभव देऊन जाईल त्यासाठी तुम्ही हा शो एकदा नक्की पहा.यानंतर तुम्ही तुमच्या तिकिटे प्रमाणे जेवणासाठी येथील रिसॉर्टमध्ये जाऊ शकता व तिथे जेवनाची मजा घेऊ शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या