BALI

बाली

बाली हे इंडोनेशिया या देशातील प्रांत आहे.बाली एक छोटासा पण सुंदर बेटाचा भूभाग आहे.डेनपसार ही या प्रांतची राजधानी आहे .डेनपसार हे अवघे तीन लाख साठ हजार लोकांचे शहर आहे.जगातील सर्वात जास्त लोक इंडोनेशीयात बाली याच बेटाला सर्वाधीक पसंती देतात.बाली चे हवामान सर्व साधारण असल्यामुळे वर्ष भर पर्यटकांची गर्दी होते. बाली साठी साधारणत
एप्रिल ते सप्टेंबर हा काळ सर्वात चांगला मानला जातो.डीसेंबर ते जानेवारी  मधे येथे पावसाळा असतो.
बाली हे नाव घेता क्षणी भरपुर गोष्टी डोळ्यासमोर येतात. जसे येतील विशीष्ट प्रकारची भाताची शेते.खळखळ वाहणारे झरे,धबधबे,प्रसिद्ध मंदिरे  ,पब्स,पंच तारांकित हॉटेलस,विल्लाज ,पर्यवतरांगा,म्यूझीयम,आणि बरच काही.

https://youtu.be/LCqK7wZd2Pk


बाली जगातील सर्व प्रमूख विमानतळाशी जोडलेले आहे.सिंगापूर,क्वालालंपुर,बैंकॉक,होंगकॉंग,ईत्यादी प्रमूख ठिकाणे आहेत.भारतातून बाली साठी एयर आशिया,मलेशियन एअरलाइंस,गरुडा एअरलाइंस,थाई एयरवेज ईत्यादि कंपन्या सेवा पुरवतात.बाली हे भारतीयासाठी स्वस्तात होणारे पर्यटन स्थळ आहे.भारतीय पर्यटका मध्ये हनीमून कपल्स,छोटे फैमिली ग्रुप,प्रामुख्याने बालीला भेट देतात.

बाली बेटा विषयी :
बाली हे इंडोनेशिया च्या 17000 वेगवगळ्या बेटापैकी एक प्रांतीय बेट आहे.साधारणत बाली हे सुमात्रा बेटा पासुन ते जावा बेटा पर्यंत पसरलेल आहे.बाली मध्ये 8 वेगवेगळी सुबे आहेत ज्याला आपण जिल्ले म्हण्तो.डेनपसार हे त्यापैकी एक असुन राजधानी चे ठिकाण आहे.

बालीतील प्रशीद्ध पर्यटन स्थळे:
1) ऊलू वटू टेम्पल:
 हे बालीतील खुप प्रसिद्ध टेंपल आहे.सर्वसाधारणपणे हे बाली च्या दक्षिण पाश्चिम  किणारयावर बुकित या ठिकाणी आहे.ऊलू मन्हण्जे जमीन संपते ते ठिकाण आणि वटु महन्जे खडकाळ भाग.हे ठिकाण समुद्र लाटा वर सर्रफिंग साठी खुपच प्रसिद्ध आहे.या ठिकाण असणारी हॉटेलमध्ये राहान्याचा आनंदघेता यतो.याठिकानी पोहन्यावर्ती थोडी बंधने येतात कारण येतील लाटा खुप ऊसळतात.

2)तनाह लॉट टेंपल:

तनाह लॉट हे बालीच्या तबानन भागात/जिल्लयात वसलेल आहे.हेबाली च्या वेगवगळ्या खडकावर वसलेल्या 7 प्रसिद्ध मंदीरा पैकी एक होय.येथील मान्यतेनुसार हे एक 450 ते 500 वर्षापूर्वीचे हिंदू मंदीर आहे. येथे बाली व हिंदु पौराणीक चालीरीती ची अजोड अशी रसमिसळ  पहायला मिळते. या मंदिराची सजावट ही समुद्री सापाची नक्षीदार चित्रे व निसर्ग निर्मळ पाणी यांचा अजोड संगम आहे.हे मंदिर सर्व साधारणपणे 980 मीटर उंचीवर असल्यामुळे येथून बराचसा भाग दृष्टीक्षेपात येतो.येथून दक्षिण भागातील ऊल वटू मंदिर पहाता येत.मंदिराचा खालच्या भागातून पर्यटकांनादर्शन घेता येते. मंदीरा काही भागात पर्यटकांना प्रवेश नाही, येथे फक्त या देशातील नागरिक व साधुसंतांसाठी राखीव आहे. या परीसरातून सुर्यास्त दर्शनाची विहंगम पर्वणी पाहावयास मिळते. हौशी पर्यटक येथे फोटो ची हौश भागवतात.हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. त्यामूळे हे ठिकाण चूकवून चालणार नाही.
हे मंदीर वर्षभर सकाळी 10 पासुन ते रात्री 7वाजे पर्यंत पर्यटकासाठी खुले असते. सकाळी 9 पर्यंत मंदिरास भेट देण्याचा प्रयत्न केला तर येथे खुप कमी गर्दी असते. संध्याकाळी येथे खुप गर्दी होते. सुर्यास्त झाल्यानंतर येथे केकाक (बाली नृत्याच्या एक हिंदू प्रकार आहे) तो पाहता येतो. या साठी तिकीट काढून घेणे गरजेचे आहे.
मंदिरात प्रवेशासाठी स्त्री व पुरुष दोघांनाही काही नियम आहेत जसे की डोक्यावर टोपी अथवा रुमाल.खांद्यावरती व पाय झाक लेले असावेत.
तनाह लॉट हे प्रसिध्द स्थान अस्ल्यामुळे येथे दळणवळण ची चंगली सोय आहे. सेंमयांक किंवा कुटा येथून 20मिनिटात पोहोचता येते.

3)माऊंट बटूर:


माउंट बटूर हा एक ज्वलंत ज्वालामुखी आहे.समुद्रसपाटी पासुन अंदाज 5600 फूट ऊंचीवर आहे. येथून खुप छान नैसर्गिक सौंदर्य पहायला मिळते.यात 2000 साली निघालेला लावा,बटूर लेक,आणि आआसपास चा परिसर.
सन 2012पासुन हे पर्यटन स्थळ युनेस्को चा यादीत सामिल झाले आहे. पर्वतारोहि साठी हे ठिकाण एक पर्वणीच आहे.यामुळे याला चुकवून चालणार नाही.
येथे पोहायचण्यासाठी कुटा,उबुड तसेच सेंमयांक या ठिकाणाहून कट येते. किंतामणी पर्यंत बसेस मिळतात. येथे जाण्यासाठी टैक्सी सर्वात चांगला पर्याय आहे.
साधारणत मे ते जुलाई पर्यंतचा काळ सर्वोत्तम आहे.

4)टेग्लाल्यंग राइस टेरेस:


https://www.instagram.com/p/BvTV-kSlXN_/?igshid=i5glu80ttnph


हे ठिकाण शहाराच्या रहदारी पासुन थोड वेगळ आहे.डोंगरमाथ्या वरील विशिष्ट प्रकारची भात शेती लक्ष वेधून घेते.सर्व ठिकानी असणारी हिरवळ हे उबुड चे खास वैशिष्टये आहे.सकाळची वेळ ही सर्वोत्तम वेळ आहे.साधारणतः सुर्योदया नंतर तासाभरात भेट द्यावी.
5) कुटा बीच :

कुटा बीच हे बाली तील सर्वात प्रसिद्ध बीच आहे. बाली विमान तळा पासुन थोड्या अंतरावर असणारे हे ठिकाण सोनेरी वाळू, नाइट लाइफ,स्वस्त हॉटेल्स,बीच कलब्सय मुळे कुटा हे पर्यटकांचीपहिली पसंती आहे.
बीच वर वेगवेगळी ऐक्टिविटी आहेत यात,स्कूबा,बीच स्पा,बीच सर्फिंग अशी वेगवेगळी पर्याय ऊपलब्ध आहेत.
स्वस्तात मिळणारी मुबलक सेवा या ठिकाणाला सर्वात वरती ठेवते.
कुटा हे बाली चे हृदय आहे.
सर्व तरुण पर्यटकांची पहीली पसंती कुटाच आहे
कुटा बीच वर जेवनाची छान सोय आहे.येथील क्याफे मैनेजर स्वत मेन्यू कार्ड घेउन फिरत असतात. कॉफी सुधा खुप छान पर्याय आहे.

6)नुसा पेनीडा आयलंड :

नुसा पेनीडा आयलंड हे बाली मेन बेटा पासुन वेगळ बेट आहे.क्ल्लूँगकूंग जिल्यातअसणारे हे ठिकाण महण्जे बाली चा सौंदर्यतील पाचू आहे.हे त्याचा दोन भावंडा पेक्षा जास्त सूंदर तर आहेच पण मोठे ही आहे यापेक्षा नुसा लेंबॉनगन व नुसा सेनिंनगन हे आकारमानने छोटे आहेत.

नुसा पेनीडा आयलंड हे स्कूबा,सर्फिंग,साठी खुप प्रसिद्ध आहे.
दररोज येथे फेरी सेवा चालते.जी या तीनही बेटाना जोडते.
बेटावर असणारे हिंदू मंदिरे,निळाशार समुद्र,रुपेरी वाळू ही याची वैशीष्ठे आहेत.या बेटावरुन सुर्यास्त दर्शनाची वेगळी मजा अनूभवता येते. बेटावर असणारी हॉटेल्स जग भरातील खाद्य पदार्थ ऊपलब्ध करुन देतात.

7)नुसा डुआ:

याचे वर्णन सर्वांग सुंदर असेच करावे लागेल, या बीच  वर  सर्व काही आहे यात शंकाच नाही,येतील  शॉपींग कॉमप्लेक्स,मोठेच मोठे गोल्फ कोर्स,स्वच्छ रुपेरी वाळू व नीळाशार किनारा हे येथील वैशिष्टये.हनिमुन कपल्स साठी हे स्वर्गच आहे.


बालीच्या आयुंग नदी मध्ये व्हाईट वॉटर राफ्टिँग चा चीत्य थराराक अनुभव घेन्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या. हा उबुड पर्यंतचा अनुभव अगदी अविस्मरणीय क्षण आहे.

10) उबुड:



ऊबड महण्जे बालीचा सर्वात हिरवळ असणारा भाग असेच याचे वर्णन करावे लागेल.येथील आलिशान हॉटेल्स व विल्लाज तुम्हाला वेगळा अनुभव देतील.येथे फिरण्यासाठी सायकल वापरा खुप छान अनुभव मिळेल.अगदी पैशाचे चीज होईल.
11) तीर्थ एम्पुल मंदिर:
हे एक हिंदु मंदिर आहे.मान्यतेनुसार हजारो वर्षापूर्वी चे हे मंदिर इंद्र देवाने तयार केले आहे व यात अलौकिक शक्ती आहे.जग भरातील हजारो लोक येथे भेट देतात.2017 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबमा हे पूर्ण कूटुंबा सोबत येथे येउन गेले.

मंदिराची विभागणी तीन विभागात करता येईल
मंदिराचे  प्रवेशद्वार हे एक भले मोठे दगडी बांधकाम केलेले द्वार आहे.स्थानिक भाषेत याला कैंडी बंटर संबोधतात.मंदिरात थोडेसे आत गेल्यावर मंदिराचा जो भाग दिसतो याला जबा पुरा संबोधतात . प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात दोन द्वारपालचे पुतळे आहेत.हे एक अत्यंत सुंदर अशी कलकुसर आहे
येथून पुढे मंदीराच्या मुख्य भागात प्रवेश होतो.हा भाग जबा तेंगा या नावाने ओळखला जातो. हा मंदिराचा मुख्य भाग आहे येथेच मंदिरातील 30 वेगवेगळी पॉईंट आहेत. या ठिकानी हजारो लोक स्नान करुन पवित्र होत असतात. अस मानल जात की येथे अंघोळ केली की पाप धूतले जाते.
मंदिराचा शेवटी जेरोन जे ठिकाण येथे ,जेथे भक्त विश्राम करतात.मंदीरातुन भर पडते वेळेस कोई माशांचा भला मोठा पूल(हौद)लागतो.
हे मंदीर हिंदू देव श्री हरी विष्णू याना समर्पित आहे. अस मानल जात की हे सर्व स्वर्गातून जमीनीवर पाणी येत आहे. त्यामुळे  याला पवित्र मानलं जात.
12)लोविना बीच:

लोविना बीच हे बालीतील हटके पर्यटन  स्थळ महणून प्रसिद्ध पावले आहे.लोविना हे साधारणतः 8 किमी लांबीचा किनारपट्टीचा भूभाग आहे. या मध्ये तेथील काही गावचा समावेश आहे जसे,कालीआसेम,कालीबुकबुक,अंतूरन आणि तुकड मुंगा हे गावे आहेत या सर्वाना एकत्रित पने लोविना आसे संबोधले जाते.लोविना बीच हे येथील काळी लावा मिश्रित वाळू पहायला मिळते. लोविना हे निळ्याशार पाण्याचा बीच असुन येथे,स्कुबा,सर्फिंग, कर्ता येते.

लोविना प्रसिद्ध आहे ते येथील बॉटल नोज डौलफिन साठी. हे मासे पाहण्याची  सर्वात चांगली वेळ सकाळी सुर्योदयाची आहे. सूर्याच्या किरणा सोबत हे मासे पृष्ठभागावर पोहतात.
13) ऊलून दानु टेंपल:

बेडू


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या