केरळ

केरळ

 देव भूमि केरळ असे सार्थ बिरुद मिरवणार दक्षिण भारतातील एक छोट पण अगदी महत्वाचे राज्य आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असणारे केरळ आपल्या विविधतेसाठी ओळखले जाते. त्रीवेन्द्रम हे या सुंदर राज्याची राजधानी आहे.केरळ हे कर्नाटक व तामीळनाडु या दोन राज्याशी लागून आहे. अरबी समुद्रातील लक्ष द्वीप बेट व पश्चीम घाट यात पसरलेला निमुळता भूभाग होय. साधारणतः 600किमी लांबीचा समुद्रकिनारा या राज्याला लाभला आहे,याशिवाय केरळ हे ब्याक वॉटर (back water) साठी जग प्रसिद्ध आहे.केरळ मिरची व रबर उत्पादनात प्रमूख भुमिका बजवतो.मासेमारी येथील एक प्रमूख व्यसाय आहे खुप मोठ्या प्रमाणात लोक यावर अवलंबून आहेत. केरळ अननस उत्पादनात व नारळ उत्पादनात भारतातील प्रमूख राज्य आहे.केरळचा चहा व कॉफी उत्पादनात राज्याचा वरचा क्रमांक लागतो. केरळ पर्यटन व्यवसायात भारतातील एक प्रमूख राज्य आहे दर वर्षी हजारो पर्यटक केरळला भेट देतात. भारतीय हत्ती हा केरळ चा राज्य प्राणी असुन ग्रेट होर्न्बील (धनेश)राज्य पक्षी आहे. या शिवाय फणस हे फळ असुन कल्पतरू (नारळ) राज्य वृक्ष आहे.

 केरळातील प्रमूख पर्यटन ठीकाणाविषयी

 त्रीवेन्द्रम: हे शहर केरळ या राज्याची राजधानी आहे.हे शहर भारतातील प्रमूख शहराशी रस्ते,समुद्र व विमानाने जोडलेले आहे. यात मुंबई,दिल्ली,चेन्नई,बंगलोर,कोलकाता ही प्रमूख शहरे आहेत.

 प्रमूख स्थळे: पद्मनाभस्वामी मंदीर,पद्मनाभपूरम पैलेस,नेपियर म्यूझीयम झू,श्री चीत्र आर्ट गेलरि,

 गुरुवायुर:

 गुरुवायुर हे दक्षीणेकडील हिंदू संस्कृतीतील प्रमूख धर्मीक ठीकाण आहे. येथे भाविक फळ,पैसे,मसाले इत्यादीची तुला करुन दान करतात.

कोची:


अरबी समुद्राची राणी असे बिरुद मिरवणारे हे शहर केरळ राज्याचा दक्षिण भागात वसले आहे.एर्नाकुलम व कोची हे जूळी शहरे भारताच्या दक्षिण पश्चीम भागात आहेत. कोची हे 1341पासून एक प्रमूख बंदर आहे.पूरातन काळा पासून हे अरबी,चिनी,यूरोपियन,व्यापार्यासाठी प्रमूख व्यापार केंद्र आहे. कोची हे मसाल्याच्या पदार्थांची मोठी बाजारपेठ आहे. हे केरळ मधील सर्वात मोठे शहर असुन भारतातील वेगवेगळ्या शहराशी जोडलेले आहे. कोचीला केरळ चे प्रवेशद्वार असे ही संबोधिले जाते. प्रमूख स्थळे: फोर्ट कोची बीच,सैंटा क्रूज ब्यासिलीका,चीनी मासेमारी चे जाळे,डच पैलेस, बोलागट्टी पैलेस ही प्रमूख पर्यटनस्थळ आहेत.


मुन्नार:

मुन्नार हे दक्षिण भारतातील प्रमूख थंड हवेचे ठिकाण आहे. पश्चीम घाटा तील पर्वत राजित,एड़ूक्की जिल्यात हे वसले आहे. 19व्या शतकाच्या शेवटी येथे चहाची लागवड करन्यात आली. येथील एर्विकुलम पार्क हे नीलगिरी थर (एक प्रकारची शेळी) चे आश्रयस्थान आहे. जवळच लक्कम धबधबा आहे. येथेच अण्णमूडी हे 2695मीटर ऊंचीचे पर्वत शिखर आहे.
प्रमूख स्थळे: एर्विकुलम पार्क,अण्णमूडी,मट्टूपट्टी तलाव,कुंडला लेक,ईको पॉईंट,चियापारा धबधबा,ब्लॉसम पार्क, चाहचे मळे.

थेक्कडी :
एड़ूक्की जिल्ह्यातील हे पर्यटन स्थळ पेरीयार राष्ट्रीय उद्यान साठी प्रसिध्द आहे. हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे यात शंकाच नाही.हे ठिकाण सदहरीत,मिश्र हरीत,उष्ण कटिबंधीय वने व सवाना गवताळ प्रदेश हा भारतीय हत्तीसाठी महत्त्वाचे आश्रय स्थान आहे. याशिवाय येथे सांबर,गौर,वाघ,मक्याक माकड,नीलगीरी वानर येथील प्रमूख प्राणी आहेत.
हे उद्यान 777वर्ग किमी भूभाग क्षेत्रफळावर पसरले असून यापैकी 360वर्गकिमी भूभाग हा अतिशय घनदाट सदा हरीत वनचा प्रदेश आहे. हे उद्यान 1978 मध्ये वाघा साठी राखीव जंगल घोषीत केले गेले.
पेरीयार नदीवर बनवलेले पेरी यार तलाव व पाण्या साठी येणारे हत्ती,रानगवा,हरणे येथील मुख्य आकर्षण आहे. येथे जीप मधून किंवा बोटितून सफरीची मजा घेता येते.

अल्लेप्पे: (अल्लपुजा)

अल्लेपी हे ठीकाण कोची पासुन साधारणतः 100किमी अंतरा वर आहे. अल्लेपी हे केरळ च्या बैक वॉटर साठी जगप्रसिध्द ठिकाण आहे.अल्लेपी हे हाउसबोटी साठी प्रसिद्ध आहे. होलांड शीवाय फ़क्त येथेच पाण्याखाली भात शेती होते.अल्लेपी हे छोटे छोटे कैनाल व बैक वॉटर चे जाळे आहे. येथे वर्ष भर पर्यटक भेट देतात.
दाट पाम वने, सर्प नौका शर्यती येतील विशेष आकर्षण आहे.

अथिरापल्ली:
साधारणत थ्रिसुर पासुन  60कीमी अंतरावर असणारे अथिरापल्ली धबधबा 80फूट ऊंच व 330फूट रूंद आहे.केरळ मधील सर्वात मोठा धबधबा एक वेगळाच आनंद देतो.

कूमारकोम:
वेंबनाड या खार्या पाण्याच्या सरोवराच्या  किनारयावरील कूमार को म हाउस बोटी साठी प्रसिध्द आहे. येथे कुकू,सैबेरीयन कारकोचे पाह्य ला मिळतात.येथील पथिरमनल बेट हे प्रवासी पक्ष्यासाठी खूप प्रसिध्द आहे.येथे राहण्यासाठी उत्तोमतम हॉटेल्स  आहेत.हे केरळ चे एक प्रसिद्ध ठिकाण आहे.

कोवलम:
त्रीवेन्द्रम या राजधानीचे ठिकाण पासुन साधारणतः 20 किमी अंतरावर असणारे कोवलम हे एक छोटेसे शहर आहे. येथील हवा बीच व समुद्र बीच प्रमूख पर्यटन स्थळ आहेत.

चेरूथूरुथी :पर्यटन दृष्टी ने हे ठिकाण खूप महत्त्वाचं आहे. कोची पासुन साधारणपणे 2 तासाच्या अंतरावर असणारे हे ठिकाण केरळ चे वेगळे पण दाखवते. निवांतपणे राहण्यासाठी हे एक सर्वोत्तम ठिकाण आहे. या ठिकाणचे ईको गार्डन रेसोर्ट हे एक नैसर्गिकरीत्या सर्वोत्तम राहण्याचे ठिकाण आहे. अधीक माहीती साठी खालील लिंक वर क्लिक करा


मर्रारीकुलम:
हे अल्लेपी जिल्ह्यातील छोटेसे गाव आहे.येथील बीच खूप छान आहे यात शंकाच नाही
 अधीक माहीती पाहिजे असेल तर कृपया खालील लिंक वर क्लिक करा

कोल्लम: हे ठिकाण अष्टामूडी तलाव किनारी आहे. येथे आपणास जटायु पार्क पहायला मिळते.



केरळ व केरळ पर्यटन विषयी अधीक माहीती असेल तर कृपया खालील वेबसाईटवर क्लिक करा





































टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या