Andaman

अंदमान व निकोबार
अंदमान निकोबार हे भारताच्या पूर्वेकडील बंगालच्या उपसागरतील बेटेआहेत. 572वेगवेगळ्या बेटाचा समूह मिळुन हा प्रदेश तयार होतो.
अंदमान व निकोबार हा भारताचा केंद्र शाषित प्रदेश आहे. या बेटाची वैशिष्टये म्हणजे हिरवीगार घनदाट अछ्यादीत वने,मुबलक असणारी वनसंपदा हे या प्रदेशाचे वेगळपण आहे. अंदमान समूहात असणारी 550 बेटापैकी 28 बेटावर मानवीवस्ती आहे,याशिवाय आकाराने लहान असणारे निकोबारच्या 22 पैकी 8 बेटावर वस्ती आहे. यापैकी काही बेटावर प्रवास्यांना फिरण्यासाठी सक्त मनाई आहे.निकोबार हे अंदमान पासुन 150 किमी अंतरावर आहे.
भारताच्या मुख्य भुभागा पासुन वेगळी असणारी ही बेटे भारताची शान आहेत. पोर्ट ब्लेअर हे या प्रदेशाची राजधानीचे शहर आहे.अंदमान हे भारतीय सेनेचे मह्त्वाचे ठिकाण आहे.पोर्ट ब्लेअर चे वीर सावरकर विमानतळ देशातील शहराना विमान मार्गे व समुद्रीमार्गे जोडलेले आहे.
भारतातून मुंबई,हैद्राबाद,बेंगलोर,कोलकाता,दिल्ली,चेन्नई ईत्यादि ठिकाणाहून थेट सेवने जोडले आहे.विशाखापट्टणम येथुन बोटीने जाता येते.
अंदमान व निकोबार हे बेटाचे समूह जैव विविधतेने नटलेले प्रदेश आहेत. सदहरीत वनाचा भाग आसणारया अंदमान व निकोबार ला वर्षभर भेट देता येते. साधारणतः डीसेंबर ते मे हा सर्वोत्तम काळ मानला जातो.अंदमान मध्ये 3900मिमी इतका पाऊस पडतो.अंदमान हा सर्वासाठी पर्वणीच ठरतो.

पोर्ट ब्लेअर:

पोर्ट ब्लेअर ही अंदमान व निकोबार या समूहाची राजधानी आहे.हे शहर बेटाच्या दक्षीणेकडील भागात आहे.शहरात पाहण्याजोगी वेगवेगळी भरपुर ठिकाणे आहेत यापैकी काही पुढिलप्रमाणे आहेत.
1) सेल्लुलर जेल:
या ठिकाणाला स्वताचा इतिहास  आहे. हे इंग्रज कालीन वास्तू स्वताचा वेगळा ठसा मांडून आहे. हे ठिकाण आता वारसा स्थळ म्हणून ओळखलं जात.ही वास्तू म्हणजे वीर स्वातंत्र्यवीर सैनीकावर इंग्रांजानी केलेल्या अमानुष छळाची मुक साक्ष देते .1906मध्ये बांधलेली हे इमारत तीन मजली असुन सात वेगवेगळया पाकळ्या मध्ये वीभगली आहे.या सर्वात मध्य भागी एक बुरुज आहे. याचे आणखी एक वैशीष्ठे म्हणजे यात असणारे सर्व खोल्या ह्या एक सारख्या आकाराचा आहेत,ज्या एक सेल समान आहेत म्हणून हे सेल्लुलर होय. येथे स्वातंत्र्यवीर सावरकर याना ठेवलेली खोली असुन येथे  त्यांची तस्वीर ठेवलेली आहे.या खोलीत जाऊन दर्शन घेन्याची सोय आहे.परिसरात एक भला मोठा पिंपळ वृक्ष आहे.येथे एक ज्योत तेवत ठेवली आहे.बाजुच्या भागात स्वतंत्र सैनीकाना देण्यात येणारे कामाचे प्रतिकात्मक चित्रे आहेत. यात कोलुवर तेल काढणे,टोपली विनणे इत्यादि  कामे दर्शवलेलि  आहेत. येथून थोडेसे पुढे उजव्या हाताला फाशी देण्यासाठी बांधलेली जागा असून येथील दोर आणखी पाहता येतात.सध्या ही वास्तू स्वतंत्र सैनिकांना समर्पीत वारसा स्थळ असुन येथील म्यूझीयम सकाळी 0900ते 1200 व दूपारी 0130ते 0445या वेळेत उघडे असते. रोज संध्याकाळी होणारा लाईट ऐण्ड सावूंड शो येथील खास आकर्षण आहे हा कार्यक्रम दोन वेळेस होतो. बुधवारी व शुक्रवारी हा 0715वाजता होणारा कार्यक्रम इंग्रजीत होतो.
2)नेताजी सुभाषचंद्र बोस बेट:
साधारणतः 1 वर्ग किलोमीटर पेक्षा लहान असणारे हे बेट पोर्टब्लेअर च्या पूर्वेकडे आहे. 1858ते 1941पर्यंत हे राजधानीचे ठिकाण होते. 1941 मध्ये जपानी सैनिकानी यावर कब्जा करून हे युध्द कैद्यासाठी राखीव केले.मुख्य बेटा पासुन येथे बुधवार सोडून  पोहचन्यासाठी फेरी बोट आहे.
3) अंथ्रोपोलॉजिकल म्यूझीयम:

1775-1976 या वर्षी याची स्थापना करण्यात आली असून हे या बेटावर राहणारया 4 प्रमूख प्रकारच्या जन जातीय समुहा बद्दल माहिती देतात. यात जर्वा,सेनिन्थील,ओंग,बृहद अंदमानी,व निकोबारच्या  2 जनजाती प्रमूख आहेत. हे ठिकाण सोमवारी व शासकीय सुट्टी दिवशी बंध असते.हे सकाळी 09 ते 1200 व दूपारी 0100 ते 0400 वाजे पर्यंत चालू असते.
4) समुद्रीका (नवल मरीन म्युझियम)

हे भारतीय नौदला तर्फे चालवण्यात येते. हे ठिकाण म्हणजे समुद्रातील आढळणारी जैव विविधता,रंग बिरंगी मासे,शिंपले व समुद्री खजिना याची एकत्रीत माहिती मिळण्याचे ठिकाण होय.  हे पोर्ट ब्लेअर मधील महत्वाचे ठिकाण आहे.
दररोज सकाळी 0900 ते 1200 व दूपारी 0200 ते 0500 या वेळेत सोमवार व शासकीय सुट्ट्या सोडून उघडे असते.
5)कार्बन कोव्ह बीच:

शहराच्या मध्यवर्ती भागापासुन 6किमी अंतरावर असणारा,नारळ व पाम च्या थाटीत असणारा हा समुद्रकिनारा जवळ आसणारया हॉटेल्स,बार मिळे पर्यटकाची पसंती मिळवतो.येथून जवळच स्नेक आईलंड व जपानी बंकर पहायला मिळतात. पाण्यावरचे खेळ व पोहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
6) नोर्थ बे बीच:

भारतीय रुपयाच्या वीस रुपये नोटेवर असणारे लाईट हाउसचे चित्र  हे येथील विशेष ओळख आहे. मुख्य बेटाच्या उत्तरेस असणारे हे बेट कोरल रीफ,समुद्री संपत्ती दर्शन या साठी खुप प्रसिद्ध आहे. बेटावर अंडर वॉटर वॉक सध्या खुप प्रचलीत आहे.
7)चिडीया टापू:

हे ठिकाण पक्षी निरीक्षण करण्यारया साठी अगदी स्वर्गच आहे.येथून दिसणारा सूर्यास्त,सुंदर बीच,समुद्र स्नानासाठी उत्तम आहे. पण येथे मगरी ची विशिष्ट काळजी घ्यायला हवी.हे ठिकाण दक्षीणेकडील सर्वात शेवटचे ठिकाण आहे. येथील बायोलॉजिकल पार्क सौंदर्यात भर घालतो.
 बारटांग आयलंड:
https://www.instagram.com/p/Bp6PAC1AT88/?igshid=1h6nxdl6m94i6

दक्षिण व मध्य अंदमान या मध्ये बारटांग आईलंड वसलेल आहे.खारफूटी ची जंगले,चुन्या पासुन तयार झालेली गुफा,पोपटा साठी प्रसिद्ध असणारे ठिकाण जलकी (मड वोल्कनो) हे या ठिकाणाला खास बनवतात.
पोर्ट ब्लेअर पासुन 100किमी अंतरावर असणारे बारटांग जाण्यासाठी पहाटे 0100वाजता निघावे लागते.सकाळी 06वाजता जंगल निरीक्षकांच्या परवानगीने प्रवेश मिळ्तो. रस्त्याने जाताना जर्वा या जमाती चे लोक भेटू शकतात.येथे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे,यासाठी 25000रुपया पर्यंत दंड लागू शकतो.पुढे गेल्यास बोटीने खाडी पार करावी लागते. बारटांग ला पोहोचल्यावर तेथून पुढे जाण्यासाठी छोट्या बोटी वापरतात
अ) लाइम स्टोन केव्ज:

बारटांग जेट्टी पासुन अर्धा तास छोट्या बोटीने प्रवास केल्यानंतर आपण नायदर जेट्टी पोहचतो, या दरम्यान चा प्रवास महण्जे  स्वर्गीय अनुभव आहे .खारफुटी जंगलातून होणारा  बोटिचा प्रवास,यात उडणारे पाणी सर्व काही अगदी स्वप्नवत आहे.येथून पुढे दीड किमी पायी प्रवासनंतर आपण गुफे जवळ येतो.येथे जंगलातून पायी चालण्याची मज्या काही निराळीच आहे.हया हजारो वर्षापासून बनलेल्या गुफा एक नैसर्गिक चमत्कार आहेत.
ब) मड वोल्कनो
भू गर्भात होणारया हालचाली मुळे जमिनितील वायू वर ढकलला जातो व प्रुष्टभागावरुन यामुळे तयार होणारा गाळ स्वरूपात जमिनिवर पसरतो.हे एक नैसर्गिक आकर्षण पहायला मिळते.
ग) पोपटांचे बेट:

बारटांग जेट्टी पासुन जवळ असणारे निर्मनुष बेट,या ठिकानी संध्याकाळ झाली की हजारोंच्या संखेने विविध ग्रूप मधे पोपट येथे येतात.या सर्वाना प्यारा कीट्स असे संबोधतात.रात्रभर थांबून सकाळी हे पक्षी परत जातात.हे एक गुढ रहस्य आहे की पक्षी येथेच का येतात.

अशा प्रकारे तुम्ही बारटांग दर्शन करु शकतात.

स्वराज द्वीप/ ह्याव लॉक आयलंड:
https://youtu.be/ltvCl8Ebtv4

पोर्ट ब्लेअर पासन 39किमी अंतरावर उत्तरपूर्व दिशेला असणारा 113वर्ग किमी चा भू प्रदेश. हा प्रदेश सुंदर रुपेरी वाळूचे किनारे,घनदाट झाडी आणि निळाशार समुद्राचेखोलवर दिसणारे सुंदर दर्शन यामुळे हा द्वीप खुप प्रसिद्ध आहे.
स्वराज द्वीप वर पोहचण्यासाठी फिनिक्स बे पोर्ट ब्लेअर येथुन सरकारी बोट,मैक क्रूज व हेलिकॉप्टर ची दररोज सेवा सुरू आहे.
पोर्ट ब्लेअर हून स्वराज द्वीप जाण्यासाठी बोट सर्वात चांगला पर्याय आहे. सरकारी बोट 02तास 30मिनिट इतका वेळ घेते,या काळात बोटीवर चालणारे संगीत,नाच गाणे सर्व काही धमाल आहे. बोटीवर असणारे वेगवेगळे भाषिक प्रवासी,त्यांचे संगीत सर्व आनंदाची बरसात करतात. हा इतका रंगारंग धमाल असते की वेळचे भानच रहात नाही.
अ) राधानगर बीच:

राधानगर बीच हा द्वीपावरील फेरी ठिकाणाहून 12किमी दूर दक्षिण किनार्यावर आहे. हा बीच टाईम मग्ज़ीनं नुसार आशिया खंडातील एक सुंदर बीच असे याचे वर्णन आहे.रुपेरी वाळू,साधारण 2 किमी लांबी व 30 ते 40 मीटर बीच. खोल पर्यंत असणारे स्वचछ नितळ पाणी हे काही वैशीष्ठे आहेत.पांढरी बारिक वाळू हे येथील आणखी एक आकर्षण.राधानगर हे सर्वात जास्त पसंतीचे ठीकाण आहे.
राधानगर बीच हा ऊंच झाडानी वेढलेला आहे.अगदी किनार
किनार्या जवळ येई पर्यंत बीच दिसत नाही.पोहण्यासाठी एक सुंदर बीच आहे यात शंकाच नाही.
ब) विजयनगर बीच:
विजयनगर बीच स्वराज द्वीपाच्या पूर्वेकडील  भागात पसरला आहे. या किनारपट्टीवर असणारे मोहाची झाडे येथील विशेष आकर्षण आहे.जमिनीस समांतर वाढणारी झाडाची बुंधे काही अंतरा नंतर सरळ वरती ऊंच वाढायला लागतात. यामुळे किनार
किनार्यावर चांगली सावली पडते. बीच वर चालन्यासाठी हा सर्वात चांगला पर्याय आहे.
क) एलिफंट बीच:
स्वराज द्वीप समुहवरील एलिफंट बीच स्कुबा,स्नोर्कक्लींग,अंडर वॉटर वर्ल्ड,यासाठी प्रसिद्ध आहे.साधारणतः 30मिनीटात येथे बोटीने पोहचता येते.हा एक सुंदर बीच आहे यात शंकाच नाही.येथे सकाळी लवकर उठून सुर्योदया बरोबर पोहचून सर्व गोष्ठी कराव्यात.हवामाना नुसार येथे कधी कधी दूपारी पाऊस पडतो.एक अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी मात्र येथे जाच.
ड)काला पत्थर बीच:
हा या द्वीपा वरील छान बीच आहे,पण येथे आनखी खुप गोष्ठी होणे गरजेचे आहे.हा बीच एक छान अनुभव मात्र नक्किच देतो. साधारणतः 12किमी अंतरावर असणारा हा बीच एक सुनाद्र ठिकाण आहे.याच्या सौंदर्या साठी एक वेळेस निस्छीत बजेट द्यावी.

शहीद द्वीप समूह/नील आईलंड:
अंदमान बेटा पासुन 30किमी दक्षिणेकडे एक अगदी छोटासा बिंदु एवडा प्रदेश शहीद समूह/नील आईलंड म्हणून ओळखला जातो.नील बेटावर जाण्यासाठी पोर्ट ब्लेअर व स्वराज द्वीप समूह येथून दररोज फेरी सेवा आहे.स्वच्छ नितळ पानी,सुंदर समुद्र किनारा,
निवांत निसर्ग सोबत पांढरी शुभ्र वाळू ही येथील आकर्षण होय.

नील हे येथील घनदाट सदहरीत जंगले व भाजीपाला लागवडीसाठी विशेष प्रसिद्ध आहे.यामुळे याला फळ भाज्याचे कोठार संबोधले जाते.येय्हे येथे रामायणातील नावावरुन जागेची नावे ठेवली आहेत.
अ) भरतपूर
ब)लक्ष्मणपूर
जेट्टी पासुन 2किमी अंतरावर असणारा उथळ  पाण्याचा किनारा म्हणुन प्रसिद्ध आहे.
क)सीतापूर
ड)रामनगर

शांत व निवंतपणा येथील ओळख आहे.येथील सर्वात लांब भाग फक्त 5 किमी आहे ,दोन एक तासात संपूर्ण आईलंड फिरून होईल.






टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या