THAILAND...... LAND OF SMILE


थायलंड
हा शब्द उच्चारला नंतर आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ते येथील स्वच्छ समुद्रकिनारे थायलंड मधले विविध महल येथील बुद्धा टेंपल्स. सर्वसाधारण भारतापासून 2667 किलोमीटर अंतरावर हसणारे बँकॉक हे राजधानीचे शहर आहे. बँकोक हे शहर सर्व भारतातील प्रमुख शहरांशी जोडले गेले आहे यात प्रामुख्याने मुंबई ,दिल्ली, चेन्नई ,बेंगलोर ,कोलकत्ता या शहरांचा समावेश आहे. सर्वसाधारण भारतातून हजारो पर्यटक हे थायलंडला भेट देत असतात.थायलंडमधील काही प्रमुख शहरे आहेत ज्यापैकी बँकॉक, पटाया, फुकेट , क्राबी, को लांता ,कोसामूवी, चीअंग माई, चीअंग राई ही प्रमुख ठिकाणे आहेत. भारतीय पर्यटक सर्वसाधारण बँकोक आणि पटाया ठिकाणी भेटी देतात. बँकोक भारतीय पर्यटकांसाठी या ठिकाणी नाईट सफारी जंगल सफारीचा आनंद घेऊ शकतात.शॉपिंग मॉल्स ,थोड्याशा अंतरावर असणारं सफारी वर्ल्ड आणि मरीन पार्क, छायो फ्राया कृज. सफारीआणि मरीन पार्क हे सर्व दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागले गेले आहे यामध्ये सफारी ची मजा घेऊ शकता मरीन पार्क मध्ये ओपन शो वगैरे वेगळे शोचा आनंद घेऊ शकता


बँकॉक:

बँकॉक हे प्रमुख शहर असून हे प्रमुख विमानतळ आहे . बँकॉक पासून सर्वसाधारणतः दोन तासाच्या अंतरावर असणारे पटाया हे पर्यटकांचे आकर्षण आहे.

पटाया:

थायलंडमधील पटाया हे शहर तेथील नाईट लाईफ साठी विशेषता खूप प्रसिद्ध आहे.पटाया नाईट लाईफ हे पर्यटकांना वर्षभर खुणावत असते. येथील वेगवेगळी प्रसिद्ध असे पर्यटन स्थळे पैकी एक असणारे कोरलआयलँड. सर्व साधारणता सकाळी नऊ वाजता सुरुवात होणारी ही सहल दुपारी साधारण दोन वाजेपर्यंत संपते, यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आनंद घेऊ शकता. त्यामध्ये बोटिंग, पॅराग्लायडिंग,पॅरासेलिंग, स्विमिंग अशा वेगवेगळ्या प्रकारे आनंद घेऊ शकता. साधारणतः तासाच्या प्रवासानंतर तुम्हाला मुख्य शहराकडे जेवणासाठी परत आणले जाते. पटाया शहरामध्ये असणारे वेगवेगळे शो बघायला मिळतात. पटाया या शहरांमध्ये असणारे बंजी जंपिंग टावर. जेम्स गॅलरी हेसुद्धा एक महत्त्वाचं ठिकाण आहे. पटाया मध्ये असणारा अलकाझार शो हा पर्यटकांचे विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. याशिवाय पटाया मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शोची रेलचेल असते त्यामध्ये पर्यटक आपल्या सोयीनुसार वेगळे शो पाहू शकतात. पटाया मध्ये भारतीय पर्यटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे जेवणाची सोयआहे. भारतीय पर्यटकांसाठी येथे भारतीय जेवणाची सोय होऊ शकते. पटाया मध्ये भारतीय पर्यटकांसाठी वेगळ्या हॉटेल्स ऑप्शन सुद्धा अवेलेबल असून यामध्ये अगदी स्वस्तातले पर्याय मिळू शकतात. पटायामध्ये याचा भारतीय पर्यटकांसाठी अपार्टमेंट चे ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत. भारतीय पर्यटक यामध्ये अपार्टमेंट्स ऑप्शन्स घेऊन आपला खर्च आणखी कमी करू शकतात. पटाया मधलेआणखीन एक भारतीय आकर्षण मध्ये येथे असणारे मसाज पार्लर, येथे अगदी दोनशे थाईबाथ पासून मसाज.आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाज , जसे ऑइल मसाज.

फुकेट:

थायलंड मधील आणखी एक महत्वाचे पर्यटन ठिकाण म्हणजेच फुकेट . फुकेट हे पासून साधारणता दोन तासाच्या अंतरावर दक्षिणेकडे असणारे ठिकाण आहे. भारतीय पर्यटक फुकेटसाठी मुंबई आणि दिल्ली येथून सरळ विमान सेवेचा आनंद घेऊ शकतात . भारतीय पर्यटकांसाठी कमीत कमी तीन दिवसाचा मुक्काम असावा फुकेटचे प्रमुख आकर्षण असणारे जेम्स बॉण्ड आयलँड हे पर्यटकांचे सर्वात वरच्या पसंतीचे ठिकाण आहे. जेम्स बॉण्ड जाण्यासाठी सकाळी साडेआठ वाजता सुरुवात होते, जेम्स बॉण्ड आयलँड हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण यामुळे पण ठरलेले आहे या ठिकाणी जेम्स बॉण्ड सीरिजमध्ये मॅन विथ द गोल्डन गन या पटाचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. या गोष्टीला आता साधारण पंचवीस वर्षे काम पूर्ण झाले आहे त. येथे जाताना पर्यटक समुद्रामध्ये पोहण्याचा आनंद घेऊ शकतात.


फुकेट मधील भारतीय दुसरे महत्त्वाचे अट्रॅक्शन म्हणजे येथील फी -फीआयलँड टूर. या सहलीमध्ये भारतीय पर्यटक समुद्री सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. या सहलीमध्ये दुपारचे जेवण एक तरंगत्या हॉटेल्समध्ये तुम्हाला दिले जाते यामध्ये भारतीय पदार्थ सोबतच लोकल पदार्थ व इतर वेगवेगळ्याजेवणाचा आनंद घेऊ शकता. फी फी आयलँड हे पर्यटकांणि आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. याशिवाय येथे असणारे बुद्धा टेंपल्स हे सुद्धा पर्यटकांचे एक विशेष आकर्षण आहे, भारतीय पर्यटक फॅन्टसी शो आनंद घेऊ शकतात. कमीत कमी खर्च आणि सरळ विमान सेवामुळे हे भारतीयांसाठी एक चांगला पर्याय आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या